पंतप्रधानांनी पलटवला स्मृती इराणींचा `फेक न्यूज`चा निर्णय
केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा फेक न्यूज लिहिणाऱ्या पत्रकारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलाय. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे डीजी फ्रँक नरोन्हा यांनी ही माहिती दिलीय.
नवी दिल्ली : केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा फेक न्यूज लिहिणाऱ्या पत्रकारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलाय. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे डीजी फ्रँक नरोन्हा यांनी ही माहिती दिलीय.
'फेक न्यूज संदर्भात जे आदेश देण्यात आले होते ते परत घेण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत तसंच ही प्रकरणं केवळ भारतीय प्रेस परिषदेत चर्चेत आणली जावीत' असं त्यांनी म्हटलंय.
स्मृती इराणींचं ट्विट
दरम्यान, केंद्रीय सूचना तसंच प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही एक ट्विट करत यासंदर्भात सूचना जाहीर केल्यात. 'फेक न्यूज संदर्भात वाद निर्माण झालाय. अनेक पत्रकार आणि संस्था यासंदर्भात सूचना देत आहेत. फेक न्यूजविरोधात आपण एकत्र येऊ शकलो तर सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला आनंदच होईल. इच्छुक पत्रकार माझी भेट घेऊ शकतील' असं त्यांनी म्हटलंय.
काय होता निर्णय
स्मृती इराणींनी दिलेल्या निर्देशानुसार, फेक न्यूज प्रसारित करणाऱ्या, लिहिणाऱ्या पत्रकाराला ब्लॅकलिस्ट केलं जाणार होतं. परंतु, आता मोदींनी स्मृती इराणींचा हा निर्णयच पलटवून टाकलाय. आता याबद्दल प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन निर्णय घेणार आहेत.