नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी दिल्लीहून ते रवाना होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएई, ओमान आणि फिलीस्तीनचा ते दौरा करणार आहेत. पीएम मोदींचा हा दौरा चार दिवसांचा असणार आहे. ज्यामध्ये फिलीस्तीनला जाणं हा मोठा कार्यक्रम आहे. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला फिलीस्तीन दौरा आहे. काही दिवसांपूर्वीच इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर आले होते.


पीएम मोदींनी म्हटलं की, भारतासाठी पश्चिम आशिया प्रमुख प्राथमिकतेचं क्षेत्र आहे. या दौऱ्याचा हेतू संबंध सुधरवण्यासाठी आहे. त्यांनी म्हटलं की, 2015 नंतर आखाती आणि पश्चिम आशियातील देशाचा हा त्यांचा पाचवा दौरा आहे. 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ते या देशांचा दौरा करणार आहेत.


पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'आमच्या वैश्विक कार्यभारात या क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे. आपले या देशांसोबत वेगवेगळ्या कारणांसाठी संबंध आहेत.' मोदींनी फेसबूकवर म्हटलं की, 'मी या दौऱ्यात भारत आणि पश्चिम आशिया तसेच आखाती देशांच्या वाढत्या संबंधासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी कटीबद्ध आहे.'


पीएम मोदी 11 फेब्रवारीला यूएईच्या शहीद स्मारकाला भेट देणार आहेत. तेथे एका सामुदायिक कार्यक्रमात ते भाग घेतील. एका हिंदू मंदिरचा पाया ठेवण्याचा देखील एक कार्यक्रम आहे. मागच्या दौऱ्यात मोदींनी येथे एक मंदिर बनवण्याचा विषय घेतला होता तेव्हा तेथील शासकाने यावर लक्ष देणार असल्याचं म्हटलं होतं.