नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आकाशवाणीवर 37 वा मन की बात कार्यक्रम असेल. सकाळी 11 वाजता असण्या-या मन की बात कार्यक्रमात मोदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या मन की बातमध्ये नोटाबंदीवर देखील भाष्य करण्याची शक्यता आहे.


8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होतं आहे. या मन की बातसाठी मोदींनी जनतेकडून ट्विटरवरून सुचना मागवल्या होत्या. आता निवडक सुचना मोदी आपल्या मन की बातमध्ये सहभागी करतील. मन की बात प्रोग्राम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावर प्रसारित केला जाईल. थेट प्रक्षेपणानंतर प्रादेशिक भाषांमध्ये त्याचं अनुवाद प्रसारित केला जाईल.