नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनल्यानंतर आणि अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा भारताला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ८ तारीख आहे. महिना देखील आठवा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.


याआधी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री आठ वाजताच पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी नोटाबंदीची मोठी घोषणा करुन संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला होता. ज्यानंतर ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या होत्या.


आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक मिम्स देखील या निमित्ताने व्हायरल होत आहे. पण पंतप्रधान मोदी काय नवीन घोषणा करतात का याकडे संपूर्ण देशाचं आणि जगाचं ही लक्ष लागलं आहे.