यंदाचा योग दिन कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचाही दिन - पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले. त्यांनी यावेळी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकतेचा दिवस आहे. जो विश्व बंधुत्वाचा संदेश देतो. यंदाचा योग दिवस कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचा योग आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल तर आजारावर विजय मिळवू शकतो.
प्राणायममुळे शरिराची स्ट्रेंथ वाढते. हे प्रभावी आहे. प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्राणायमचा तुमच्या व्यायामात समावेश करा.'
पंतप्रधानांनी म्हटलं की, योगामुळे मानसिक शांती मिळते. सयंम आणि शक्ती देखील मिळते. प्रत्येक स्थितीत अडिग राहण्याचं काम योगा करतो. गीतेत योगाची व्याख्या करताना देवाने म्हटलंय की, कर्माची कुशलता हाच योग आहे. योगाच्या माध्यमातून जीवनात योग्य बनण्याची शक्ती मिळते. योगाला जीवनाचा भाग बनवला पाहिजे. तर आपण नक्की यशस्वी होऊ. नक्की विजयी होऊ.
'कोरोनाच्या काळात जगात योगा स्पर्धेत सहभाग वाढणं योगाचं महत्त्व दाखवतं. कोरोनामुळं जगात योगाचं महत्त्व आता वाढलं आहे. आज आपण घरीच कुटुंबासोबत योगा करत आहोत. योगच्या माध्यमातून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा घरात ऊर्जा संचारते. हा भावात्मक ऊर्जेचा देखील दिन आहे.'