नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. राज्याचा विकास सोडून मोदींना शिव्या देण्याची स्पर्धेत ते सारे काही विसरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेतील तीन राज्य आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधील जनसभेत हे भाष्य केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे आश्वासन जनतेला दिले. यासोबतच विरोधकांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री चंद्रबाबू यांना थेट लक्ष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे तुमच्या सन्मानार्थ कोणतीच कसर आम्ही सोडली नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात पक्ष बदलायला, तुम्ही ज्येष्ठ आहात दुसऱ्या पक्षांचे गठबंधन करण्यात, तुम्ही ज्येष्ठ आहात एकानंतर दुसरी निवडणूक हारण्यात आणि मी तर यामध्ये ज्येष्ठ नाही असा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. चंद्राबाबू आधी ज्यांना शिव्या देतात नंतर त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात. ते आपल्या सासऱ्याच्या पाठीत सुरा खुपसण्यात ज्येष्ठ असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 



याव्यतिरिक्त पेट्रोलियम आणि गॅस संबंधित 6,825 कोटी रुपयांच्या दोन योजनांचे लोकार्पण तसेच रिमोट कंट्रोलने नल्लोर जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉरर्पोरेशन लिमिटेडच्या एका टर्मिनलचे भूमीपूजन करणार असल्याचे भाजपा खासदार जीवी एल नरसिंह राव यांनी सांगितले.


मोदींविरोधात पोस्टर्स 



आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान रॅलीला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर, तामिळनाडूती तिरुपुर आणि कर्नाटकमधील हुबळी मध्ये रॅली करणार आहेत. तेलुगू देशम पार्टी ( टीडीपी) प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधानांच्या यात्रेस काळा दिवस म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आंध्र प्रदेश दौऱ्याआधी मोठमोठे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये पंतप्रधानांना विरोध केला जात आहे. 'मोदी नेवर अगेन' असे या पोस्टर्समध्ये म्हटले आहे.