नवी दिल्ली : संपूर्ण देशात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी प्रत्येक सण अगदी साध्या पद्धतीत साजरे होताना दिसत. कोरोनाचं सावट फक्त भारतातचं नाही तर संपूर्ण जगावर आहे. आज घरा-घरांमध्ये गणरायाचं आगमन होत आहे. कोरोनाचं सावट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे. तर पंतप्रधान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
ट्विट करत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत, 'तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा कायम राहो. गणपती बाप्पा मोरया..' असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा मोठा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करताना दिसत आहे. चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे.


कोरोनाचं सावट लक्षात घेत अनेक मोठ्या गणेश मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंगळांमध्ये आरोग्य शिबिर भरवली जाणार आहे. तर कोरोना हे संकट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे.