Corona | पंतप्रधान मोदींनी रद्द केला बंगाल दौरा, बोलावली महत्त्वाची बैठक
पंतप्रधान मोदींना उद्या होत असलेल्या सभा रद्द केल्या आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचं संकट वाढत असताना पश्चिम बंगालमधील उद्या होणाऱ्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका (West Bengal Election 2021) होत आहेत. पंतप्रधान मोदी भाजपचे स्टार कॅम्पेनर आहेत. पण देशात कोरोनाचा वाढता कहर पाहता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
पीएम मोदी उद्या महत्त्वाची बैठक घेत असल्याने बंगाल निवडणुकीसाठीच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. शुक्रवार कोरोनाच्या परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक होत आहे. (PM Modi cancel Bengal visit)
23 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांची बंगालमध्ये सभा होणार होती. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बंगाल भाजपने यासाठी मोठी तयारी केली होती. पण आता पंतप्रधान मोदींनी हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
देशात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. रोज लाखोंच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात ऑक्सीजन, बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सरकार पुढचं आव्हान वाढत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेला संबोधित करत असताना लॉकडाऊन लागू नये म्हणून प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. पण तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी काय निर्णय़ घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.