नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान मोदी लष्कराच्या जवानांसह दिवाळी साजरी करू शकतात. पीएम मोदी यावेळी राजस्थानच्या जैसलमेर सीमेवर दिवाळी साजरी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. यावेळी सीडीएस जनरल बिपिन रावतही त्यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैन्य आणि एसपीजीची दौर्‍यासाठी तयारी


पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक दिवाळी सीमेवर उभे असलेल्या जवानांसह साजरा केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी ते लोंगेवाला पोस्टवर दिवाळी साजरी करतील. यासाठी सैन्य व एसपीजीने तयारी देखील पूर्ण केली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या जैसलमेर दौऱ्यात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील सोबत असतील. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्धाची परिस्थिती गेल्या 7 महिन्यांपासून आहे. अशा परिस्थितीत मोदींच्या जैसलमेरला दौऱ्यात जवानांचा उत्साह आणखी वाढणार आहे.


लोंगेवाला पोस्ट त्याच ठिकाणी आहे जिथे 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये भयंकर युद्ध झाले होते. त्यावेळी चौकीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पंजाब रेजिमेंटच्या 3000 सैनिकांनी पाकिस्तानच्या 3 हजार सैनिकांना ठार मारले होते. यावरच सुपरहिट बॉर्डर सिनेमा बनवण्यात आला होता.


जैसलमेर दौर्‍यावरून चीन-पाकिस्तानला इशारा


सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जैसलमेर दौर्‍याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेण्यात आला आहे. असे केल्याने पंतप्रधान मोदी एकाच वेळी विस्तारवादी चीन आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला एक कडक इशारा देतील. भारत त्यांच्यापुढे झुकणार नाही आण त्यांना सर्व मार्गाने कडक प्रत्युत्तर दिलं जाईल.


पंतप्रधान मोदींनी यापूर्वी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी दिवाळी साजरी केली होती. अशा कार्यक्रमांच्या वेळी ते सैनिकांना भेटतात आणि त्यांना प्रोत्साहित करतात. त्यांच्याबरोबर वेळ घालवतातय याआधी पंतप्रधान मोदींनी लेहमध्ये अचानक पोहोचून सर्वांना चकित केले. त्यानंतर तेथे तैनात सैनिकांचा उत्साह प्रचंड वाढला होता.