नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि कोरोना विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाउनला  मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणी केली. या संबोधनानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदलला. पंतप्रधानांनी कपड्याने चेहरा झाकलेला आणि नमस्कार करतानाचा फोटो लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार आपल्या भाषणात नमूद केले आहे की लोकांनी घरातला चांगला कपडा किंवा रुमाल किंवा घरीच बनवलेल्या मास्कने देखील चेहरा झाकू शकता.


आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील आपला फोटो बदलून पुन्हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून लोक प्रभावित होतील आणि कपड्याने त्यांचा चेहरा झाकतील.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना याचा उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले की, घरामध्ये बनविलेले फेस-कव्हर किंवा मास्क अनिवार्यपणे वापरा. लोकांनी लॉकडाउन आणि सोशल डिस्टर्निंगच्या लक्ष्मण रेखाचे पूर्ण अनुसरण केले पाहिजे.


पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत असताना त्यांनी चेहऱ्यावर गमछा बांधला होता. मुख्यमंत्र्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करताना देखील त्यांनी गमछा वापरला होता. याआधी 


पंतप्रधान मोदी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये बदल केला होता. त्यांनी नावाच्या पुढे चौकीदार लावलं होतं. त्यानंतर देशभरात अनेकांनी त्यांचं अनुकरण केलं होतं.