Railways Bonus 2022: आताची सर्वात मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील 11 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) दिलं आहे. दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत (central cabinet meeting) कर्मचाऱ्यांच्या बोनसवर (Bonus) शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जल्लोषात होणार आहे. याशिवाय गरीब कल्याण योजनेला (Garib Kalyan Yojana) 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. (PM Modi Diwali gift from indian railways employees and 78 days bonus nm)


'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Raiway Employee) उत्पादन लिंक्ड बोनसला मंजुरी मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (Non Gazetted) संपूर्ण 78 दिवसांचा बोनस मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 11.56 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेवर 2000 कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे. 


गेल्या वर्षीही मिळाला होता बोनस


गेल्या वर्षी बद्दल बोलायचे तर 2021 मध्ये देखील रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला होता. रेल्वे कर्मचार्‍याला 30 दिवसांसाठी 7000 रुपये म्हणजे 78 दिवसांसाठी सुमारे 18000 रुपये बोनस मिळेल.