मोदींनी दुसऱ्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
राजकोट : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
मोदींनी जर बाकीच्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटण्यास मदत झाली असती. राहुल गांधी म्हणालेत, काँग्रेसचे विचार आणि भाजपची विचार यांत खूप मोठे अंतर आहे. काँग्रेसने सगळ्यांचे ऐकले आणि मोठे निर्णय आमलात आणलेत.
आताचे सरकार कोणाचेच ऐकत नाही. या सरकारने कोणत्याही व्यक्तीचे ऐकले नाही आणि जीएसटी आणि नोट बंदी लागू केली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे, राहुल म्हणालेत.
'आमच्याकडे चांगले वक्ता नसले तरी लोकांची ऐकण्याची गुणवत्ता आच्याकडे आहे. लोकांच्या समस्यांबद्दल जाणून घेऊ इच्छित होतो, आम्ही प्रत्येकाच्या सूचना पाहिल्या आणि नंतर मोठे निर्णय घेतले. नोट बंदीच्या भाषणाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांना गप्प केले.
जीएसटीने लहान व मध्यम उद्योगांवर वाईट परिणाम केला आहे. या दोन प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार मिळू शकेल. मोठय़ा उद्योग देशातील गरजेप्रमाणे रोजगार निर्मिती करू शकत नाहीत, असे ते हल्लाबोल करताना म्हणालेत.