नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरोधात लढाईनंतर भारत आज जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मान की बात कार्यक्रमात म्हणाले. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाला हे पाहून अत्यंत वेदना झाल्या असं पंतप्रधान यांनी मन की बातमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत घडलेला प्रकार लाजीरवाणा होती, तिरंग्याचा अपमान पाहून देशाला अतिव वेदना झाल्या असं मोदींनी मन की बातमध्ये म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोरोना लसीकरणाच्या बाबतीत भारत स्वावलंबी झाला आहे आणि जितका सक्षम भारत होईल तितका जगाला जास्त फायदा होईल. असं ही त्यांनी म्हटलं.  


नवीन वर्षात जानेवारी महिन्यात साजरे करण्यात येणाऱ्या सण आणि उत्सवांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, "या सर्वांच्या दरम्यान, 26 जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला. आपल्याला येणाऱ्या काळात नवीन आशा आणि नाविन्यता आणायची आहे. आम्ही गेल्या वर्षी संयम आणि धैर्य दाखवला. यावर्षीही आपण कठोर परिश्रम करून आपला संकल्प सिद्ध केला पाहिजे.


केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या निषेधाच्या वेळी पंतप्रधान म्हणाले की, सरकार शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत, हे प्रयत्न सुरूच राहतील. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वाढदिवस 23 जानेवारीला शौर्य दिन म्हणून साजरा करण्याबाबत ही उल्लेख केला. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा उल्लेखही त्यांनी केला.


कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या देशभरात लसीकरण मोहिमेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, 'संकटाच्या काळात भारत जगाची सेवा करण्यास सक्षम आहे कारण आज आपण औषधे आणि लसांबाबत स्वयंपूर्ण आहोत.'


पंतप्रधान म्हणाले की, 'अवघ्या 15 दिवसांत भारताने 30 लाखाहून अधिक लसीकरण केले आहे, तर अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाला 18 दिवस आणि ब्रिटनला  36 दिवस लागले. कोरोनाविरूद्ध भारताची लढाई एक उदाहरण बनली आहे, तशीच आता आमचं लसीकरण मोहीम देखील जगात एक उत्तम उदाहरण बनत आहे.'