पंतप्रधान मोदींनी ४२ महिन्यांमध्ये दिली ७७५ भाषणं
पंतप्रधान मोदी एक चांगले वक्ते आहेत हे त्यांच्या विरोधकांना देखील चांगल्या प्रकारे माहित आहे. 2014 पासून राज्याच्या निवडणुका भाजपने केवळ आपल्याच बळावर लढवल्या. पंतप्रधान मोदींनी दरमहा 19 भाषणं केली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान दर तीन दिवसांनी 2 भाषण देतात. जनतेशी संवाद करण्याची कला, तात्काळ भाषण देण्याची क्षमता पंतप्रधानांच्या लोकप्रियतेमुळे आहे. पंतप्रधान बनल्यानंतरपासून त्यांनी 775 सभा घेतल्या आणि भाषण केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी एक चांगले वक्ते आहेत हे त्यांच्या विरोधकांना देखील चांगल्या प्रकारे माहित आहे. 2014 पासून राज्याच्या निवडणुका भाजपने केवळ आपल्याच बळावर लढवल्या. पंतप्रधान मोदींनी दरमहा 19 भाषणं केली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान दर तीन दिवसांनी 2 भाषण देतात. जनतेशी संवाद करण्याची कला, तात्काळ भाषण देण्याची क्षमता पंतप्रधानांच्या लोकप्रियतेमुळे आहे. पंतप्रधान बनल्यानंतरपासून त्यांनी 775 सभा घेतल्या आणि भाषण केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 वर्षांच्या कार्यकाळात 1401 भाषण दिले. याचा अर्थ त्यांनी प्रत्येक महिन्यात 11 भाषणे दिली. सध्या, पंतप्रधान मोदींची पाच वर्षांची मुदत संपलेली नाही आणि त्यांनी माजी पंतप्रधानांच्या तुलनेत अधिक भाषण दिले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की पंतप्रधानांनी 2015 मध्ये बहुतेक भाषणे दिली. 2015 मध्ये त्यांनी 264 भाषणं दिली. यावर्षी पंतप्रधानांनी बऱ्याच परदेशी भेटी केल्या आणि या वर्षी त्यांनी परदेशातही सार्वजनिक भाषणं केली. पंतप्रधान मोदी यांनी परदेशात 164 भाषण दिले आहेत.