नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज अविश्वास ठरावावर चर्चा सुरु आहे. काँग्रेसला बोलण्यासाठी 33 मिनिटं देण्यात आली होती. पण काँग्रेसकडून बोलताना राहुल गांधी यांनी एक तासाचा वेळ घेतला. या दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी देखील त्यांना बसण्यासाठी नाही सांगितलं. राहुल गांधींनी आज भाषणातून संपूर्ण देशाला एक वेगळं रुप दाखवलं. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच मोदींवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोजगार, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. राहुल गांधींनी राफेल डीलचा मुद्दा उचलला. संरक्षणमंत्री आणि पंतप्रधानांवर देशाशी खोटं बोलल्याचा आरोप त्यांनी लावला. पंतप्रधान मोदी देखील त्यांच्या या बोलण्यावर हसत होते. पण या आरोपांनी संरक्षण मंत्री आणि इतर मंत्री आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी डोकलामचा मुद्दा उचलला. मोदींच्या चीन दौऱ्यावर टीका केली. शेतकरी, गरीबी, बेरोजगारी, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण याबाबत देखील मोदींना प्रश्न विचारले. 


पंतप्रधान मोदी देखील 6.30 वाजता बोलतील अशी माहिती मिळते आहे. या दरम्यान ते राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देतात की त्याला हसत टाळतात हे आता पाहावं लागणार आहे. पीएम मोदींनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, काँग्रेस मुस्लमानांचा पक्ष आहे का?. पण मोदींकडे बोलण्यासाठी अनेक वेगवेगळे मुद्दे असतील. पंतप्रधान मोदी त्यांच्या काळात झालेल्या कामांची माहिती देशासमोर ठेवतील.