नवी दिल्ली: याआधी काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक वापरण्यावर पूर्णपणे बंदी आली होती. प्लास्टिक वापरणाऱ्यांना 5000 रुपयांचा दंड लावण्यात आला होता. मात्र पुन्हा अनेक ठिकाणी सऱ्हासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याचं दिसत आहे. मात्र प्लास्टिक वापरण्यासाठी आता पुन्हा एकदा बंदी येणार आहे. यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्याकडे जर आता प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर त्याचं नियोजन करा. जर नसतील तर या पुढे त्या विकत घेणं टाळा. कारण प्लास्टिकच्या वापरावर आता केंद्र सरकारनं बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जो नव्या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. 


देशाला प्लॅस्टीक मुक्त कऱण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंगल युज प्लॅस्टीक उत्पादनांवर पुढील वर्षापासून बंदी लागू कऱण्यात आली आहे. 1 जुलै 2022  पासून ही बंदी लागू होईल. 


देशात यापुढे 120 मायक्रॉनच्या पॉलिथीन पिशव्यांना परवानगी असेल. ७५ मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपासून मायक्रॉनच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल असंही सांगण्यात आलं आहे.