COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीवासियांना डबल गिफ्ट दिलं आहे. ईस्टर्न पेरिफेरल आणि दिल्ली मेरठ महामार्गाचं मोदींनी लोकार्पण केलं. या दोन्ही महामार्गाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन झालं. ईस्टर्न पेरिफेरल महामार्ग वेळेआधीच पूर्ण झाला असून हा महामार्ग १३५ किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग बनवण्यासाठी ३० महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र अवघ्या १५ महिन्यांमध्ये या महामार्गाचं काम पूर्ण करण्यात आलंय.


ईस्टर्न महामार्गामुळे दिल्लीतील प्रदुषणात घट होणार?


ईस्टर्न महामार्गावर ७० मिनिटांमध्ये १३५ किलोमीटर अंतर कापलं जाऊ शकणार आहे. ईस्टर्न महामार्गामुळे दिल्लीतील प्रदुषणात घट होणार असून या महामार्गामुळे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ६ शहरं जोडली जाणार आहेत. दिल्ली-मेरठ महामार्गामुळे दिल्ली ते मेरठ अंतर ४५ मिनिटांमध्ये कापलं जाणार आहे.


सायनेझद्वारे कळणार गाड्यांच्या वेगाची माहिती 


दिल्ली-मेरठ महामार्गा ८४१ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. महामार्गांवर लावण्यात आलेल्या सायनेझद्वारे गाड्यांच्या वेगाची माहिती कळणार असून अधिक वेगानं गाड्या चालवणाऱ्या चालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे. महामार्गावर लावण्यात आलेल्या हायटेक कॅमेरा ट्रॅफिकवर नजर ठेवणार असून अपघात झाल्यास कंट्रोल रुममध्ये सूचना पोहचली जाईल.