नवी दिल्ली : भारतात ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी चिनी सोशल मीडिया अॅप Weibo देखील बंद केलं आहे. चिनी माइक्रोब्लॉगिंग साईटवर पीएम मोदी यांनी २०१५ मध्ये पोस्ट करणं सुरु केलं होतं. Weibo वर पीएम मोदींनी केलेले ११५ पोस्ट होते. ज्या मॅन्युअली हटवण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Weibo अॅपवरुन वीआयपी अकाऊंट हटवण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींचं अकाउंट हटवण्यासाठी या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. आतापर्यंत ११३ पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत. २ पोस्ट डिलीट करण्यासंदर्भात बोलणी सुरु आहे.


ज्या २ पोस्ट डिलीट केलेल्या नाहीत त्यामध्ये पीएम मोदी आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो आहे. Weibo साठी त्यांच्या राष्ट्राध्यक्षाचा फोटो डिलीट करणं शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हे २ फोटो अजून अकाऊंटवर दिसत आहेत. या अकाऊंटवर पीएम मोदी यांचे 2 लाख 44 हजार फॉलोअर्स आहेत.