नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत केली. येत्या १६ आणि १७ तारखेला पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. त्यापूर्वी मोदींनी आज आपल्या केंद्रातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींनी देशभरात कोरोनाची स्थिती काय आहे व त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यावर नजर टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारायला पाहिजे'

या आढावा बैठकीदरम्यान अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतीयांश रुग्ण पाच राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये आहेत. गेल्या १० दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांवरून तीन लाखांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ११,४५८ नवे रुग्ण आढळून आले होते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. तर देशातील एकूण मृतांची संख्या ८,८८४ इतकी झाली आहे. 


कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका


महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. कालच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. त्यापाठोपाठ दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दिल्लीत कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी वर्तविली होती. जुलैमध्ये दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच लाखाच्या आसपास जाईल, अशी भीतीही दिल्ली सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे खरोखरच जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या मध्यापर्यंत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्यास (पीक पॉईंट) परिस्थिती कशी हाताळायची, हा प्रश्न केंद्र सरकारसमोर आ वासून उभा आहे.