नवी दिल्ली : 'पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताला अवघे १० ते १२ दिवस पुरेसे आहेत', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'पाकिस्तानचा भारताने तीन युद्धांमध्ये पराभव केला आहे. आपल्या सैन्य दलांनी ठरवलं तर अवघ्या १० ते १२ दिवसात ते पाकिस्तानचा पराभव करु शकतात.' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत एनसीसीच्या पीएम बॅनर कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं की, 'ज्या देशाच्या युवकांमध्ये शिस्त, इच्छाशक्ती आणि निष्ठा आहे. त्या देशाचा विकास कोणीच थांबवू शकत नाही.'



जम्मू-काश्मीरचा उल्लेख करत पीएम मोदींनी म्हटलं की, 'काश्मीर भारताचा मुकुटमणी आहे. ७० वर्षानंतर अनुच्छेद ३७० हटवलं. आम्हाला माहित आहे की आमचा शेजारील देश ३ वेळा युद्ध हारला आहे. आमच्या सैन्याला त्यांना धुळ चारण्यासाठी १० दिवसापेक्षा अधिक वेळ लागणार नाही. याआधी सैन्याने कारवाईची परवानगी मागितली. तेव्हा तेव्हा याआधीच्या सरकारने ती नाकारली. आज युवा विचारांनी देश पुढे चालला आहे. त्यामुळे तो सर्जिकल स्ट्राईक करतो आहे. एअर स्ट्राईक करतो आणि दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारतो. याचा परिणाम आज आपण बघत आहात.'


मोदींनी म्हटलं की, 'आता काहीही टाळलं नाही जाणार तर टक्कर दिली जाईल. तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल, की मागील ३० वर्षात वायुसेनेमध्ये कोणतंही नवीन आधुनिक लढाऊ विमान आलं नाही. या सरकारने देशात आधुनिक फायटर राफेल विमान आणलं. लवकरच देशाच्या आकाशात हे विमान उडताना दिसेल.