PM Modi Pakistani Sister : रक्षाबंधनाच्या (raksha bandhan) सणाला काहीच दिवस उरले आहेत. भाऊ-बहिणीच्या या पवित्र सणाच्या दिवशी अनेक बहिणी पंतप्रधान मोदींनाही (PM Modi) राखी बांधतात. अशातच रक्षाबंधनाच्या पवित्र सणाआधी सीमेपलीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास राखी आली आहे. दरवर्षी प्रमाणे, पंतप्रधान मोदींची पाकिस्तानातील बहिणीने राखी पाठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमर मोहसीन शेख या पंतप्रधान मोदींच्या मानलेल्या बहिण आहेत. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आपल्या भावासाठी राखी पाठवली आहे आणि 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.


कमर मोहसीन शेख यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही पंतप्रधान मोदी जिंकून पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 


पंतप्रधान मोदींकडे मागितली भेट!


त्या म्हणाल्या की, मला आशा आहे की ते (पंतप्रधान मोदी) मला यावेळी दिल्लीला बोलावतील. मी सर्व तयारी केली आहे. मी स्वतः ही राखी रेशमी रिबनसह भरतकामाच्या डिझाइनचा वापर करून बनवली आहे. शेख यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छाही दिल्या आहेत.


पंतप्रधान मोदींची पाकिस्तानातील बहिण कमर मोहसीन शेख यांनी गेल्या रक्षाबंधनाला राखी आणि पत्र पाठवले होते. मोहसीन शेख 20-25 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधत आहेत.