मुंबई : राजस्थानच्या वाळवंट प्रदेशात असलेलं एक छोटं गाव लोगेंवाला जैसलमेर हे भारत-पाकिस्तान बॉर्डरवर आहे. या जागेला विशेष महत्त्व आहे. कारण येथे 1971 मध्ये 4-5 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानला भारताने धुळ चारली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोंगेवाला पोस्ट आज 'इंडो-पाक पिलर 638' च्या नावाने ओळखळी जाते. 1971 मध्ये पाकिस्तानने भारताच्या लोंगेवाला चेकपोस्टवर हल्ला केला होता. येथून जैसलमेरमध्ये जाण्याचा त्यांचा कट होता. पण तो यशस्वी झाला नाही. 


1997 मध्ये आलेला हिट सिनेमा 'बॉर्डर'ची शूटिंग येथेच झाली होती. सिनेमात याच युद्धाची कहाणी दाखवण्यात आली आहे.


लोंगेवाला पोस्ट महत्त्वाची मानली जातो. जैसलमेर स्थित पश्चिम सीमेवर असलेल्या या पोस्टवर भारताच्या 120 जवानांनी पाकिस्तानच्या 2000 सैनिकांना धुळ चारली होती. लोंगेवाला युद्ध पश्चिमी भागात लढलं गेलेलं मोठं युद्ध होतं. 197 मध्ये जैसलमेर काबीज करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.


लोंगेवाला पोस्टची जबाबदारी मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्याकडे देण्यात आली होती. या युद्धात कुलदीप सिंह मेजर होते. त्यानंतर ते ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचले. ब्रिगेडियर चांदपुरी यांनी या विजयाचं संपूर्ण श्रेय सैनिकांना दिलं.


मेजर चांदपुरी यांच्याकडे फक्त 120 जवान होते. समोर पाकिस्तानची 51वीं इंफ्रेंटी ब्रिगेडचे 2,000 सैनिक होते. ज्यांना 22वीं आर्म्ड रेजीमेंटची देखील मदत मिळाली होती. 5 डिसेंबर 1971 ला अचानक पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. परिस्थिती नाजूक होती. पण मेजर चांदपुरी यांनी त्याला आव्हान दिलं. संपूर्ण रात्र त्यांनी फक्त 120 जवानांसह पाकिस्तानी सैन्याचा सामना केला. मेजर चांदपुरी यांनी 2000 सैनिक आणि पाकिस्तानचे 40 टँक रोखून ठरले. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानचे टँक उद्धवस्त केले.


1997 मध्ये आलेल्या बॉर्डर सिनेमात सनी देओल यांनी मेजर चांदपुरी यांची भूमिका केली आहे.