नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून अधिक जण जखमी झाले.


या घटनेनंतर हरियाणाच्या खट्टर सरकारवर जोरदार टीका झाली. यावर आज पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं आहे. पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून यावर वक्तव्य केलं आहे. मोदींनी म्हटलं आहे की, 'बुद्ध आणि गांधीचा हा देश आहे. आस्थेच्या नावावर हिंसा सहन केली जाणार नाही. राजकीय, परंपरा, व्यक्तीवरील श्रद्धेवरून हिंसा खपवून घेतली जाणार नाही. व्यक्ती किंवा संघटनेला कायद्यासमोर झुकावे लागेल.'