आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिभाषणानंतर सरकार आजच 2017-18 या आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण संसदेच्या पटलावर मांडेल. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली आपला चौथा अर्थसंकल्प सादर करतील. येत्या वर्षभरात महत्वाच्या राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुका, आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या आधीचं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यातून सामान्य नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल असं बोललं जातंय.
पंतप्रधान मोदींचं आवाहन
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विधायक गोष्टींवर चर्चा व्हावी, असंही मत मोदींनी व्यक्त केलं. याशिवाय सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याची ग्वाही देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली.