अहमदाबाद :  पंतप्रधान मोदी आज गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आज ते गुजरातमध्ये अनेक सभा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. याआधी राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडण्याच्या तयारीत नाही आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरणार आहेत.


सोमवारी पंतप्रधान मोदी 4 सभा घेतील. मोदींची सभा भुज, जसदाण आणि कमरेजमध्ये होणार आहेत. निवडणुकीच्या सभांना सुरवात करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आशापुरा मातेच्या मंदिरात जाणार आहेत.


गुजरातमध्ये आधीच बरेच मोठे नेते ठाण मांडून बसले आहेत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी नेतृत्व सांभाळलं आहे. रविवारी पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशाला संबोधित केले होते. त्यावेळी गुजरात भाजपा कार्यकर्त्यांनी 'मन की बात, चाय के साथ' असा कार्यक्रम चालवला होता.