कोरोना संदर्भात पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
देशभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव जगभरात त्याचे भयंकर रूप दाखवत आहे. भारतामध्येही दीड हजाराहून अधिक लोकं कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांत परिस्थिती वेगाने बदलत आहे, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. गुरुवारी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, ज्यामध्ये कोरोनासंबधित सद्यस्थितीवर चर्चा होईल.
ही दुसरी वेळ आहे जेव्हा पंतप्रधान कोरोनाच्या विषयावर सर्व मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करतील. यापूर्वी, देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची अंमलबजावणी केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि कोरोनाशी सामोरे जाण्याच्या तयारीची माहिती मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या विषयावर दोनदा देशाला संबोधित केले आहे. ज्यामध्ये एकदा कोरोना विषाणूमुळे एक दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला, तर दुसऱ्यांदा त्यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत देशात सुरू राहणार आहे.
या व्यतिरिक्त पंतप्रधान आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणूवरील विविध प्रदेशातील लोकांशी बोलले आहेत. यात वैद्यकीय, माध्यम, समाजसेवक, उद्योगपती यासह इतर विभागातील अनेक लोकं सामील झाले आहेत.
देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत
महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्तेच लक्षणीय वाढ झाली आहे. 27 मार्च रोजी देशातील कोरोनामुळे त्रस्त लोकांची संख्या 1000 पार केली, तर बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत ही संख्या 1700 वर केली.
गेल्या 48 तासात 400 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. केरळ आणि महाराष्ट्र हे आतापर्यंत देशात सर्वाधिक बाधित राज्ये आहेत. देशात कोरोना विषाणूमुळे एकूण 53 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.