चंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या `चंपारण सत्याग्रहाला` आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे.
पटना : महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे.
PM नरेंद्र मोदी यांच्या खास गोष्टी
आमच्या सरकारचा मंत्र आहे की, सबका साथ सबका विकास
आमचे सरकार जन - मन जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
देशातील 350 हून अधिक जिल्हे शौचालय मुक्त करणार
अटकने, लटकने आणि भटकने यासारख्या परंपरा आता संपणार
गंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांजवळ प्रोजेक्टची निर्मिती करता येणार
चंपारण सत्याग्रहाची माहिती
चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते