नरेंद्र मोदींची आज अमेरिकेतील 5 दिग्गज कंपन्यांच्या CEO सोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते वॉशिंगटनमध्ये पाच दिग्गज अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. दौऱ्यात भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यवसाय विकसित करण्याबाबत चर्चा होऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांच्या निमंत्रणावरून 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत. जो बाइडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. याआधी दोन्ही नेत्यांमध्ये वर्चुअल मिटिंग झाल्या आहेत.
या कंपन्यांच्या सीईओसोबत चर्चा
क्वलकॉम (Qualcomm)चे सीईओ क्रिस्टानियो आर एमॉन, एडॉब(Adobe)चे शांतनु नारायण, फर्स्ट सोलर (Fist solar)चे मार्क विडमर, जनरल एटॉमिक्स (General Atomics)चे विवेक लाल, ब्लॅकस्टोन (Blackstone)चे स्टीफन ए श्र्वार्जमॅन या दिग्गज कंपन्यांच्या सीईओशी पीएम मोदी चर्चा करणार आहेत.
भारतीय वेळेनुसार मोदींच्या मिटिंग
7.15 PM Qualcomm चे सीईओ क्रिस्टानियो आर एमॉन
ही एक मल्टीनॅशनल सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर, वायरलेस टेक्नॉलॉजीशी संबधीत सेवा देणारी कंपनी आहे. भारतासह जगभरात सेमीकंडक्टरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भारतीय ऑटो कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
7.35 PM Adobeचे चेअरमन शांतनु नारायण
ही एक मल्टीनॅशनल कंपनी असून एडॉब इलस्ट्रेटर, एडॉब एक्रॉबॅट सारखे सॉफ्टवेअर बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे.
7.55PM वर फर्स्ट सोलरचे सीईओ मार्क विडमर
ही सोलर पॅनल बनवणारी युटिलिटी स्केळ पीवी पावर प्लांटच्या उत्पादनासंबधी सेवा प्रादन करणारी कंपनी आहे.
8.15 PM एटॉमिक्सचे सीईओ विवेक लाल
ही एक एटोमिक रिसर्च आणि डेवलपमेंट आधारीत एनर्जी आणि डिफेन्स फर्म आहे. कंपनीत जगभरातील निष्णात वैज्ञानिक काम करतात.
8.30 ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन ए श्र्वार्जमॅन
ही न्युयॉर्कस्थित पर्यायी गुंतवणूक व्यवसथापन कंपनी आहे.