५ एप्रिलला कम्प्यूटर, पंखे, एसी, फ्रिज बंद करण्याची गरज नाही : केंद्रीय उर्जा मंत्रालय
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरोधात आणि यात सामिल असणाऱ्या लढाईत सामिल लोकांसोबत एकता दाखवण्यासाठी तसेच आभार व्यक्त
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरोधात आणि यात सामिल असणाऱ्या लढाईत सामिल लोकांसोबत एकता दाखवण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ पर्यंत लाईट ऑफ करण्याचे आवाहन केले आहे.
यावर महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितिन राऊत यांनी म्हटलंय, एकाच वेळी घरातील सर्व वीजेचे दिवे बंद केल्यानंतर मोठी तांत्रिक अडचण होवू शकते, अशी तांत्रिक अडचण झाली, तर त्याला संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील.
नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी, रात्री ९ वाजता घरातील वीजेचे दिवे बंद घरून, दारात तेलाचे दिवे, मेणबत्ती, मोबाईलचे लाईटस नऊ मिनिटासाठी, लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनामुळे व्होल्टेज कमी जास्त होऊ शकतं, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
पण यावर केंद्रीय उर्जा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी, रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटे वीजेचे दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे. रस्त्यावरील लाईट्स, कम्प्युटर, घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, पंखे बंद करायला सांगितलेले नाही. फक्त घरातील वीजेचे दिवे ९ मिनिटे बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
यात हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महापालिका सेवा, उत्पादन सेवा, अत्यावश्यक सेवा यांच्यासाठी हे आवाहन नाही. पंतप्रधान यांचं आवाहन फक्त घरांसाठी आहे. स्थानिक प्रशासनाला सांगण्यात आलं आहे की, स्ट्रीट लाईट सुरू ठेवा.