नवी दिल्ली : कोरोनाची सामना करण्यासाठी अनेक संस्था, उद्योजक, सेलिब्रिटी, खेळाडू आर्थिक मदत करत आहेत. यात आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तींची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिरा बेन यांनी देखील पीएम केअर फंडसाठी २५ हजारांची मदत दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी ५ वाजता टाळ्या आणि थाळी वाजून कोरोना फायटर्सचे धन्यवाद मानायला सांगितले होते. तेव्हा देखील मोदींच्या आईने टाळी वाजवून याचं समर्थन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी २८ मार्चला मदतीचं आवाहन केलं होतं. यासाठी त्यांनी 'पीएम केअर्स फंड'चा अकाऊंट नंबर देखील शेअर केला होता. त्यानंतर अनेकांनी मदत केली.


पीएम मोदींनी ट्विट करत मदतीचं आवाहन केल्यानंतर याला अनेकांचं समर्थन मिळालं. 


- अभिनेता अक्षय कुमारने 25 कोटींची मदत केली.
-  टाटा ट्रस्टकडून ५०० कोटींची मदत
- क्रिकेटर विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्माने ३ कोटींची मदत केली.
- सचिन तेंडुलकरने ५० लाखांची मदत केली.
- क्रिकेटर सुरेश रैनाने ५२ लाखांची मदत केली.