Narendra Modi Corona Kaal Story : देशभरात फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षेचा काळ असतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यासाठी परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये पार पडला. इतर राज्यातील विद्यार्थ्यी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते. पीएम मोदी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेसंदर्भात सल्ले दिले. तर विद्यार्थ्यानींही पीएम मोदी यांना अनेक प्रश्न विचारले आणि आपल्या समस्याही सांगितल्या. या प्रश्नांना उत्तर देताना पीए मोदी यांनी अनेक उदाहरणांचा दाखला देत विद्यार्थ्यांनी परीक्षा वॉरियर बनण्याचं आवाहन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीविरोधात (Coronavirus) भारताच्या लढ्याचं उदाहरण दिलं. कठिण काळाचा बहाद्दुरीने कसा सामना करावा हे पीएम मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. 


म्हणून देशभरात थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं?
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळी वाजवण्याचं आवाहन का केलं होता याचा खुलासा केला. या काळात पीएम मोदी यांनी लोकांना दिवे पेटवण्याचंही आवाहन केलं होतं. 2020 मध्ये कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं होतं. या काळात भारतात पीएम मोदींनी देशवासियांना आवाहन केलं होतं. आता चार वर्षांनी यामागच्या कारणांचा पीएम मोदींनी खुलासा केला आहे. 


4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा
थाळी वाजवल्याने किंवा दिवे पेटवल्याने कोरोनापासून दिलासा मिळणार नाही किंवा यामुळे कोरोना झालेले बरेही होणार नाहीत हे आपल्याला माहिती होतं, असं पीएम मोदींनी म्हटलं. पण कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व देशवासियांमध्ये आपण एक आहोत ही भावना जागृत करणं महत्त्वाचं होतं. जेव्हा देशभरातील सर्व लोकांनी एकाचवेळा दिवे पेटवले किंवा एकाच वेळी थाळ्या वाजवल्या तेव्हा त्यांना आपण एकटे नाही तर आपण एक आहोत याची जाणीव झाली. कोरोनाविरुद्ध आपण एकटे लढत नाही आहोत संपर्ण देश कोरोनाचा सामना करतंय,  सर्वांनी एकत्र येत संघर्ष केला तर या समस्येतून मार्ग काढता येईल हा या मागचा उद्देश असल्याचं पीएम मोदी यांनी सांगितलं.