Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून `या` शहरवासियांना मिळणार मोठं गिफ्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट करुन त्यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी कानपूर दौऱ्यावर (Kanpur Tour) जाणार आहेत. या दौऱ्याआधी पंतप्रधानांनी कानपूरमधील लोकांसाठी ट्विट केलं आहे. (pm narendra modi 28 december 2021 wil be address convocation IIT Kanpur inaugurate Kanpur Metro Rail Project)
"कानपूरमध्ये सध्या अनेक विकासकामं सुरु आहेत. या विकासकामांमुळे शहरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल. यामुळे लोकांच्या जीवनशैली सुधारेल", असं ट्विट मोदींनी केलं आहे.
मोदी काय म्हणाले?
"मी उद्या (28 डिसेंबर) कानपूरमधील लोकांना भेटण्यासाठी उत्सूक आहे. मी कानपूर आयआयटीमध्ये दीक्षान्त समारंभाला संबोधित करणार आहे. त्यानंतर कानपूर मेट्रो रेल्वे प्रक्लपाचं उद्घाटन करेन. तसेच बीना-पनकी मल्टी प्रोडक्ट पाईप लाईन प्रकल्पाचंही उद्धघाटन करणार आहे", अशी माहिती मोदींनी ट्विटद्वारे दिली.
असा आहे कानपूर दौरा?
पंतप्रधान उद्या दुपारी दीड वाजता कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान बीना-पनकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन योजनेचंही उद्घाटन करतील. याआधी पंतप्रधान सकाळी 11 वाजता आयआयटी कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभाला सहभागी होतील.