PM मोदींच्या Appointment Letter मध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं? जाणून घ्या
PM Narendra Modi Appointment Letter : भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. ज्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊ केलं.
PM Narendra Modi Appointment Letter : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सलग दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा याच पदावर विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे. रविवारी दिमाखदार सोहळ्याच मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करतीत. यावेळी देशोदेशीच्या पाहुणे मंडळींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यापूर्वी पीएम मोदींनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. जिथं त्यांनी राष्ट्रपतींना लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून, निवडणुकीच्या निकालांसंदर्भातील माहिती दिली. याचवेळी राष्ट्रपतींनी त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त तरत सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. या संपूर्ण शिष्ठाचारादरम्यान राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना नियुक्ती पत्र, अर्थात Appointment Letter देऊ केलं.
पंतप्रधानांच्या अपॉइन्टमेंट लेटरमध्ये काय लिहिलेलं असतं?
भारतीय संविधानातील अनुच्छेद 75(1) मधील तरतुदींच्या आधारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. जिथं त्यांनी मोदींना खालील बाबींसंदर्भातील आग्रह केले.
- मंत्रिमंडळात सहभागील केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या नावांसंदर्भात सल्ला देण्यात यावा.
- राष्ट्रपती भवनात आयोजित केल्या जाणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ याबाबतची महिती द्यावी.
हेसुद्धा वाचा : BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना आणखी वेग दिला. या धर्तीवर त्यांनी मित्रपक्षांशी चर्चाही केली. शनिवारपर्यंत सदर मुद्द्यावरील चर्चांनंतर मित्रपक्षांना त्याबाबतची माहिती दिली जाणार असून, त्यानंतर राष्ट्रपतींना पुन:सूचित केलं जाऊ शकतं. यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा किंवा रविवारी सकाळी 9 वाजता मंत्र्यांना पंतप्रधान निवासस्थानी बोलवून 9 जूनच्याच सायंकाळी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
सत्तास्थापनेचं समीकरण ठरलं?
सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या आगामी मंत्रिमंडळात घटक पक्षांकडून एकूण 18 मंत्री केले जाणार आहेत. यामध्ये घटक पक्षांच्या 7 कॅबिनेट मंत्र्यांची बदली करण्यात येणार असून, घटक पक्षांना 11 राज्यमंत्रीपदंही देण्यात आली आहेत. यामध्ये टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), एलजेपी, जेडीएस, एचएएममधून प्रत्येकी एक मंत्री करण्यात येईल असं म्हटलं जात असून, भाजपकडून 18 मंत्री केले जाणार आहेत.