Prahlad Modi Hospitalised : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रल्हाद मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे भाऊ आहेत. (Prahlad Modi admitted to hospital in Chennai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाऊ कर्नाटकातील म्हैसूर येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दुखापत झाली होती. प्रल्हाद मोदी पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत बांदीपूरला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली होती.



 पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांना किडनीशी संबंधित समस्यांमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदी यांना पाच भावंडे असून प्रल्हाद मोदी त्यांच्यापेक्षा लहान आहेत. प्रल्हाद अहमदाबाद, गुजरातमध्ये किराणा दुकान चालवतात आणि शहरात टायर शोरुम देखील आहे.


2001 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे प्रल्हाद मोदी हे उपाध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले होते. प्रल्हाद मोदी यांनी अनेक वेळा त्यांचे भाऊ नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या सरकारी धोरणांचा निषेध केला आहे. वृद्धापकाळामुळे सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांचे अहमदाबादमध्ये रेशनचे दुकान होते. त्यांच्या संघटनेने अलीकडेच तांदूळ, गहू आणि साखरेचे नुकसान भरपाईची मागणी केली होती ज्याचा पुरवठा रास्त भाव दुकानांमधून केला जातो. 


नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून प्रल्हाद मोदी हे आंदोलन करत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी सरकारी धोरणांविरोधात आंदोलन सुरुच ठेवले आहे.