`कोरेगावा-भीमा` घटना घडविणाऱ्यांचे कट उधळवून लावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरेगांव-भीमा सारख्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : कोरेगांव-भीमा सारख्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
कट उधळवून लावा
'कोरेगांव-भीमा' सारख्या घटना घडवून समाजात फूट पाडणाऱ्यांचे कट उधळून लावण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजप महासचिवांना दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे महासचिव, राज्यांचे प्रभारी आणि ज्येष्ठ पदाधिका-यांची बैठक ७ लोककल्याण मार्ग येथे घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.