गुजरात : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस ऎकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. 


अनेक दिग्गज नेत्यांवर अन्याय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात आज पंतप्रान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा नेहरु गांधी घरण्यावर टीकास्त्र सोडलं. धांडुका इथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘एका कुटुंबाच्या भल्यासाठी देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांवर अन्याय झाल्याचं सांगितलं. या कुटुंबामुळे अन्याय झालेल्यांमध्ये सरदार पटेल एकटे नाहीत’.


आंबेडकरांवरही अन्याय?


नेहरू यांच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही अन्याय झाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.