पाटणा : पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये अनेक दिवसांपासून पूरस्थिती आहे. या पुराचा १९  जिल्ह्यांना फटका बसला असून आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. यावेळी पंतप्रधानांनी सीमांचल भागातील पूर्णिया, अररिया, कटिहार, आणि किशनगंज जिल्ह्यांची हवाई पाहणी केली.


हवाई पाहणीनंतर पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्याचबरोबर त्यांच्या मंत्रीमंडळासोबत पटण्यात बैठक झाली. बिहारसाठी पंतप्रधानानी पाचशे कोटींची मदत जाहीर केलीय. 


बिहारला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचेही पंतप्रधानानी आश्वासन दिले आहे.