आधी पुतिन आता झेलेन्स्की... मोदी परदेशी नेत्यांना मिठ्या का मारतात? खरं कारण आलं समोर
Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन दौऱ्यादरम्यान या युद्धग्रस्त देशातील सर्वोच्च नेते असलेल्या झेलेन्सी यांना भावनिक होऊन मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र मोदी अशाप्रकारे इतर देशांच्या नेत्यांना मिठ्या का मारतात माहितीये का?
Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जगातील कोणत्याही मोठ्या नेत्या भेटतात तेव्हा त्यांना आलिंगन देतात. काही आठवड्यांपूर्वी एका दौऱ्यामध्ये त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची गळाभेट घेतली. त्यानंतर युक्रेन दौऱ्यामध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिठी मारली. मोदींच्या या मिठी मारण्याच्या सवयीबद्दल एका परदेशी पत्रकाराने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एक फारच रंजक उत्तर दिलं. भारताचे परराष्ट्र मंत्री नेमकं काय म्हणाले पाहूयात..
मोदींनी युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांना मारली मिठी
वोलोदिमिर झेलेन्स्की आणि नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीसाठी मोदी पोहोचले तेव्हा भेटल्यानंतर त्यांनी आधी हस्तांदोलन केलं. त्यानंतर मोदींनी वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिठी मारली. यासंदर्भात विदेशी पत्रकाराने प्रश्न केला. केवळ युक्रेन आणि रशियाच नाही तर परस्परविरोधी असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सर्वोच्च नेत्यांनाही मोदींनी अशाप्रकारे मिठी मारल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे.
मागील अडीच वर्षांहूनही अधिक काळापासून युद्ध सुरु असलेल्या युक्रेन आणि रशियाच्या दौऱ्यावर मोदींनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांना मिठी मारली आहे. वोलोदिमिर झेलेन्स्की यांना शुक्रवारी मिठी मारण्याआधी युक्रेनचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही मोदींनी मिठी मारली होती. मोदी आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यामधील भेटीगाठी आणि चर्चेनंतर एस. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला. गळाभेट घेण्याचं मोदींचं नेमकं धोरण काय आहे? असा प्रश्न विचारला गेला. मोदींचे वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पुतीन यांच्याबरोबर एकाच वेळी एवढे चांगले संबंध कसे? असा आशय या प्रश्नामागे होता.
आमच्या इथे जेव्हा लोक
असता एस. जयशंकर यांनी मिठी मारणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असं उत्तर दिलं. पाश्चिमात्य देशातील पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर यांनी, "आमच्या इथे जेव्हा लोक एकमेकांना भेटतात किंवा कोणी पाहुणे आले तर ते एकमेकांना मिठी मारुन भेटतात. अशाप्रकारे मिठी मारणे हा तुमच्या संस्कृतीचा भाग नसू शकतो. मात्र आमच्यासाठी अशाप्रकारे भेटल्यावर मिठी मारणे हा संस्कृतीचा भाग आहे. आजच मी पंतप्रधान मोदींनी वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिठी मारल्याचं पाहिलं आहे," असं म्हटलं.
तुमच्याकडे आणि आमच्याकडे फरक
काही आठड्यांपूर्वी मोदींनी पुतिन यांना अशाचप्रकारची मिठी मारल्याचा उल्लेख पत्रकराच्या प्रश्नात होता. यावर जयशंकर यांनी, "मी त्यांना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांना मिठी मारताना पाहिलं आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की या शिष्टाचारांच्या अर्थांसंदर्भात तुमच्याकडे आणि आमच्याकडे थोडा संस्कृतिक फरक आहे," असं सांगितलं.