गुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जीता विकास, जीता गुजरात। जय जय गरवी गुजरात! आणि हिमाचल प्रदेश में लहराया कमल, विकास की हुई भव्य जीत। असं ट्विट मोदींनी केलं आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे निकाल म्हणजे सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा आहे. अथक परिश्रम करून या राज्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना माझा सलाम. गुजरात आणि हिमाचलच्या जनेतला मी वंदन करतो. भविष्यात दोन्ही राज्यांचा विकास करण्यासाठी अथकपणे प्रयत्न करू, असं मोदी म्हणालेत.