नवी दिल्ली : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२व्या जयंती निमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत इंडिया गेट जळवून रन फॉर यूनिटीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी दिल्लीकर मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरले आहेत.


यावेळी सर्व उपस्थितांना पंतप्रधानांनी एकतेची शपथही दिली. मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री राजनाथ सिंह, क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली 



तर मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मरिन ड्राईव्ह परिसरात आयोजित रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे


  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी पटेलांचं मोठं योगदान - मोदी

  • सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला जोडलं - मोदी

  • सरदार पटेलांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला - मोदी

  • आधीच्या सरकारनं सरदार पटेलांना इतिहासात योग्य स्थान दिलं नाही - मोदी

  • सरदार पटेल यांचे योगदान युवकांपर्यंत पोहोचवले गेले नाही - मोदी