सूरत : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयआयटी (IIT) कॅम्पसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, ३०० वर्षांत टेक्नोलॉजीने जितका विकास झालेला नाहीये तितका ५० वर्षांत झाला आहे. टेक्नोलॉजी आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीला टेक्नोलॉजीशी जोडलं गेलं पाहीजे.


महात्मा गांधीजींनी साक्षरतेवरही जोर दिला. आता नागरिकांना डिजिटल साक्षर बनण्याची गरज आहे. परिवारातील प्रत्येक सदस्याला डिजिटल साक्षर बनवणं हे आमचं लक्ष्य आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


देशात कुठल्याही प्रकारचा डिजिटल भेदभाव झाला नाही पाहीजे. डिजिटल डिवाइड झाल्यास समाजात मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदाहरण देताना सांगितले की, घरातील मुलांना रिमोटने चॅनल बदलताना पाहून वयोवृद्धही तसं करण्यास शिकू शकतात.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत सरकार 'JAM' फॉर्म्युल्यावर काम करत आहे. J चा अर्थ जनधन बँक अकाऊंट, A चा अर्थ आधार आणि M चा अर्थ मोबाईल. सरकारचा प्रयत्न आहे की, देशात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना JAM फॉर्म्युलाने जोडलं जात आहे. यामुळे लेसकॅश सोसायटीही निर्माण होण्यास मदत होणार आहे. 


डिजिटल साक्षरतेच्या आधारे आपण रिसोर्सेसवर खर्च केलेल्या पैशांचा योग्य वापर करु शकू असेही मोदींनी म्हटले. आपण लेटेस्ट टेक्नोलॉजी असलेला मोबाईल फोन खरेदी करतो मात्र, त्याचे फिचर्स आपल्याला माहिती नसतात. जर डिजिटल साक्षरता वाढली तर आपण याच मोबाईलमधील सर्व फिचर्सही वापरु शकतो.