पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिल्या `या` टिप्स!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालकटोरा स्टेडियमवर १० कोटींहुन अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालकटोरा स्टेडियमवर १० कोटींहुन अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची परिक्षा याविषयावर चर्चा केली.
विद्यार्थ्यांना केला हा उपदेश
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मोदी म्हणाले, स्वतःच्या मनाचे ऐका. स्वतःवर विश्वास ठेवा. नेहमी स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. कार्यक्रमाला सुरूवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तालकटोरा स्टेडियमच्या बाहेर असलेल्या कलाकृती आणि कागदाचे प्रदर्शन पाहिले.
पालकांसाठी खास संदेश
परिक्षेची तयारी कशी करावी, तणाव मुक्तीचे उपाय यावर पंतप्रधान मोदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मोदींनी पालकांना एक खास संदेश दिला तो म्हणजे, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा. आपली अधुरी स्वप्न पाल्यांवर न लादता त्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा.