नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांचा ट्विटर प्रोफाइल फोटो (twitter handle pic) बदलला आहे. याआधी, पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवर (pm narendra modi twitter account), ऑक्टोबर महिन्यात 100 कोटी कोरोना लसीशी संबंधित एक फोटो लावला होता. आता नविन प्रोफाईल फोटोमध्ये पीएम मोदींचा हात जोडलेला फोटो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी प्रोफाइल फोटो बदलला होता, जेव्हा भारताने कोरोना लसीचे 100 कोटी डोस देण्याचा विक्रम केला होता. या विक्रमानंतर सरकार आणि सत्ताधारी पक्ष भाजपकडूनही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पीएम मोदींनीही त्यांचा प्रोफाईल फोटो बदलला होता.



आधीच्या प्रोफाइल फोटोमध्ये, पंतप्रधान मोदींनी 100 कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याच्या आनंदात सर्व देशवासियांचे अभिनंदन केले होते. या प्रोफाइल फोटोवर फ्रेमसोबतच एक संदेशही देण्यात आला होता.


पंतप्रधान मोदी हे ट्विटरवरील जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे सध्या 74 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्मवर ते सुमारे अडीच हजार लोकांना फॉलो करतात.