अयोध्या : पंतप्रधान मोदींनी रामजन्मभूमी आणि हनुमानगढी येथे दर्शन घेत नवा विक्रम रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रामजन्मभूमी  (Ram Mandir) आणि हनुमानगढी (Hanumangarhi)  येथे दर्शन करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी भूमिपूजन केलं. राम मंदिर भूमिपूजनासाठी जाण्यापूर्वी त्यांनी हनुमानगढी येथील मंदिरात पूजा-अर्चा करुन हनुमानाचं दर्शन घेतलं. प्रभु रामाचं दर्शन घेण्याआधी हनुमानाची परवानगी घेण्याची परंपरा आहे. हीच परंपरा पूर्ण करत मोदींनी श्रीराम मंदिरात जाण्यापूर्वी हनुमानगढी येथे हनुमानाचं दर्शन घेतलं.  


उत्तरप्रदेश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या विधानात पंतप्रधान मोदी हनुमानगढी येणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसंच श्री राम जन्मभूमी येथे येणारेही ते पहिलं पंतप्रधान बनले आहेत. राम मंदिराच्या भव्य शुभारंभात सामिल होण्याचं भाग्य पंतप्रधान मोदींना लाभलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


दरम्यान, जवळपास संपूर्ण देशाचं ज्या क्षणाकडे लक्ष लागलेलं होतं तो दिवस उजाडला आणि अयोध्येमध्ये अखेर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काही मोजक्या आमंत्रितांनी अयोध्येत या सोहळ्याचा अनुभव घेतला. तर, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये भूमिपूजनासाठीचा उत्साह पाहायला मिळाला. केवळ भारतातचं नाही तर साऱ्या देशभरातही या सोहळ्यासाठी उत्साहाचीच लाट पाहायला मिळाली.