नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी रायबरेलीच्या दौऱ्यावर येतायत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत विविध कामांचं मोदी लोकार्पण करणार आहेत. प्रयागराजमध्ये साडेतीन हजार कोटींच्या विकासकामांचं मोदी लोकार्पण करणार आहेत. हा मार्ग बुंदेलखंड, चित्रकूट, लखनऊ आणि उत्तर प्रदेशच्या पुर्वांचलमधील एक महत्त्वाचा संपर्क मार्ग असणार आहे. या महामार्गामुळे बांदा ते रायबेली मधील 7 ते 8 तासाचे अंतर कमी होऊन 2.5 तास इतकेच राहणार आहे. रस्ते वाहतूक आणि केंद्रीय मंत्रालयाद्वारे या संदर्भात माहिती देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच पंतप्रधान 'मेक इन इंडिया' अंतर्गत रेल्वे कोच फॅक्ट्री बद्दल जनतेला संबोधित करतील.  


जाहीर सभा 


दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर प्रयागराजमधील एका खासगी शाळेत लँड होणार आहे. प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान संगमला भेट देतील. येथे अक्षय वट आणि हनुमान मंदिराला भेट देऊन ते पूजाअर्चना करतील. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते एका जाहीर सभेला संबोधित करतील. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच सभा असणार आहे.