नवी दिल्ली :  भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत आहे. हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकार द्वारे सोमवारी Tiktok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे लाकलं आहे. शनिवारी मोदींनी 
आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज लाँच केलं आहे. आत्मानिरभर अ‍ॅप इकोसिस्टम तयार करण्यासाठी मोदींनी टेक कम्युनिटीला पुढे येण्याचे आवाहन केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, 'जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे एखादा चांगला प्रॉडक्ट आहे. तर मी टेक समाजातील माझ्या सर्व मित्रांना या चॅलेन्जमध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करतो.' असं मोदी म्हणाले. 


आत्मनिर्भर भारत ऍप चॅलेन्ज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येणार आहे. हे चॅलेन्ज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबतच अटल इनोव्हेशन मिशनला देखील जोडले गेलं आहे. 


आत्मनिर्भर भारत ऍप चॅलेन्ज दोन भागांमध्ये काम करणार आहे. एक म्हणजे जुन्या ऍप्सचं प्रमोशन आणि नवीन ऍप्सशी निर्मिती. दरम्यान भारतात प्रसिद्ध झालेल्या चिनी ऍपवर केंद्र सरकारने बंदी घालती आहे. गलवान खोऱ्यात चीनच्या कारवाईनंतर दुखावलेल्या भारताने हे पाऊल उचलले आहे.