अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये 'राष्ट्रीय एकात्मिक वाहतूक कार्ड' किंवा 'वन नेशन वन कार्ड' योजनेचं उदघाटन केलं. त्यामुळे आता, 'नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड' (National Common Mobility Card) द्वारे प्रवाशांना बस प्रवास, टोल टॅक्स, पार्किंग शुल्क, खरेदी करता येईल. एवढंच नाही तर या कार्डाद्वारे ग्राहकांना बँकेतून पैसेही काढता येणार आहेत. अहमदाबाद मेट्रोचं उदघाटन केल्यावर मोदींनी या कार्डाचं उदघाटन केलं. हे रूपे कार्ड असणार आहे. या कार्डामुळे प्रवास विषयक चिंता मिटणार आहेत. याआधी हे तंत्रज्ञान भारत परदेशातून आयात करत होता. आता ही यंत्रणा भारतातच विकसीत करण्यात आलीय. जगात सिंगापूर आणि लंडनसारख्या अवघ्या काही देशांमध्येच हे तंत्रज्ञान आहे. त्यात आता भारताचाही समावेश झालाय. बँकेतर्फे हे कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डाद्वारे मेट्रो, बस, उपनगरी रेल्वे, टोल, पार्किंग, मॉलमध्ये खरेदी अशा कोणत्याही स्वरूपाचे पैसे भरता येणार आहेत.


'वन नेशन वन कार्ड'चा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- यासाठी सर्व बँकांकडून आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये एक खास फिचर जोडलं जाणार आहे. बँकांकडून नव्या कार्डांमध्ये 'नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड' फिचर जोडलं जाईल... आणि त्याचा वापर एखाद्या वॉलेटसारखा करता येईल


- यासाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टम तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या सिस्टममुळे देशात एक इंटिग्रेटेड व्यवस्था विकसित होत नव्हती. त्यामुळे एखादं कार्ड दुसऱ्या शहरात कामी येत नव्हतं. परंतु, व्यापक स्तरावर काम करून हे कार्ड विकसित करण्यात आलंय


- या फिचरमुळे तिकीट काऊंटरवर असणाऱ्या 'पीओएस' मशीनवर हे कार्ड वापरलं जाऊ शकतं


- याशिवाय मेट्रो रेल्वेसाठी स्मार्ट कार्ड म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकेल