नवी दिल्ली :  काश्मिरमधून ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधल आहे. यात नरेंद्र मोदी यांनी या निर्णय जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताचा असल्याचं म्हटलं आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील. ३७० हटवल्यानंतर आता काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तसेच महिलांना सर्व काही सुरक्षेचे कायदे आणि कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे, दलितांनाही त्यांचे अधिकार लागू होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेणार असल्याचे संकेतही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेणार असल्याचं यावेळी त्यांनी यावेळी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकारचे सरळ नियंत्रण आणि लक्ष या प्रदेशावर असणार आहे.


भाषणाच्या सुरूवातीला पीएम मोदी म्हणाले होते, जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, सरदार पटेल यांचं होतं, डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं होतं, ते आता पूर्ण होत आहे. आता देशातील सर्व नागरीकांचे हक्क समान आहेत.



३७० हटवल्याने काही महापुरूषांचं स्वप्न पूर्ण झालं - पीएम नरेंद्र मोदी
३७० मुळे देशातील ज्या मुलींना हक्क मिळत होते, ते जम्मू काश्मीरच्या मुलींना मिळत नव्हता.
३७० मुळे जम्मू काश्मीरमधील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते.
३७० मुळे जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकाच्या संरक्षणासाठी कायदा लागू नव्हता.
३७० हटवल्याने जम्मू काश्मीरच्या लोकांचं भवितव्य सुरक्षित होणार आहे.
३७० मुळे जम्मू काश्मीरमध्ये कोणताही कायदा नाहीय.
३७० हटवल्याने जम्मू काश्मीरच्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासित प्रदेशाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळतील