भोपाळ: मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी मैदानात उतरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशातील शाहडोल येथे शुक्रवारी त्यांची पहिली सभा तर ग्वाल्हेरमध्ये दुसरी सभा होणार आहे. यानंतर ते एक दिवसाआड दररोज दोन जाहीर सभा घेणार असल्याची माहिती मध्यप्रदेश भाजपा अध्यक्ष राकेश सिंग यांनी दिली. 


रविवारी छिंदवाडा आणि इंदूरमध्ये मोदी सभा घेणार आहेत. त्यानंतरही प्रचार संपेपर्यंत पंतप्रधान राज्यात अनेक सभा घेणार आहेत. पंतप्रधान स्वतः प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर मध्यप्रदेशात भाजपाची आणखी हवा होईल. त्यामुळे पक्षाला २००पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल, असा विश्वास पक्षाचे प्रवक्ता अनिल सौमित्र यांनी व्यक्त केला.


२८ तारखेला मध्यप्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला याचा निकाल जाहीर होईल.