नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चौथ्यांदा बजेट सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं लोकसभेत अभिनंदन केलं. यानंतर त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर जात विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजेट सादर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय आणि सौगत राय यांच्यासोबत चर्चा केली. राय यांनी म्हटलं की, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितलं की, त्यांनी पश्चिम बंगाल मधून राज्यपाल जगदीप धनखड यांना परत बोलवून घ्यावं.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि धनखड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी धनखड यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला ब्लॉक केलं.


पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची देखील भेट घेतली. केरळचे के के सुरेश आणि गोव्याचे फ्रांसिस्को सरदिन्हा यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. सरदिन्हा यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करताना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोवा मुक्ती दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाबाबत चर्चा केली. काँग्रेसचे काही नेतेच या कार्यक्रमाला पोहोचले होते.


बजेट सादर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेतून बाहेर पडले. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचीही भेट घेतली. माजी मंत्री ए राजा यांचीही भेट घेतली.


पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, द्रविड़ मुनेत्र कषगमचे दयानिधी मारन, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पक्षाचे एन के प्रेमचंद्रन, वायएसआर काँग्रेसचे कृष्ण डी लावू आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची ही भेट घेतली.